Mumbai, फेब्रुवारी 11 -- Mumbai News: मुंबई विमानतळावरून चोरीला गेलेल्या आयफोनच्या मदतीने मालकाच्या खात्यातील जवळपास दीड लाख रुपये गायब केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका अज्ञात व्यक्ती आयफोन चोरी करताना दिसला. हा संपूर्ण प्रकार ८ फेब्रुवारी मध्यरात्री १२.४५ मिनिटांनी घडला. याप्रकरणी सहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील खारघर येथील रहिवाशी बी. दत्ता (वय, ६३) यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपला आयफोन चोरीला गेल्याचा आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून १.४८ लाख रुपये गायब झाल्याचा दावा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता हे नुकतेच आपल्या वयैक्तिक कामासाठी कोलकाताला गेले होते. दरम्यान, ८ फेब्रुवारी रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास त...