Mumbai, जानेवारी 27 -- Stock Market News : शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मंत्र समजला जातो. मात्र सगळेच हा मंत्र अमलात आणतात किंवा सगळ्यांना ते शक्य होत असं नाही. मात्र ज्यांना शक्य होतं, त्यांना त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया (TRIL) लिमिटेडचे गुंतवणूकदार सध्या हाच अनुभव घेत आहेत.

भारतातील ट्रान्सफॉर्मर उत्पादकांपैकी एक असलेल्या या कंपनीच्या शेअरच्या किंमतींमध्ये अलीकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. हा शेअर सातत्यानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. विशेषत: घसरणीनंतर लगेचच सावरण्याची मजबूत क्षमता या शेअरनं दाखवली आहे. किंबहुना दुप्पट वेगानं उसळी मारली आहे. त्यामुळं मागच्या अवघ्या पाच वर्षांत शेअरहोल्डर्स करोडपती झाले आहेत.

गेल्या दोन वर्षांत कंपनीचे शेअर्स ७४.५० रुपयांवरून ९४६ रुपयांच्या ...