भारत, मार्च 4 -- रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांची नुकतेच 'मुंबई टेक वीक'मध्ये मुलाखत घेण्यात आली. ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ हर्ष जैन यांनी आकाश यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचे वडील मुकेश अंबानी यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. आपले सर्वात मोठे प्रेरणास्थान वडील मुकेश अंबानी हे असून कुटुंबात वाढल्यामुळे आपली मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा कशा आकाराला आल्या याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आकाश अंबानी म्हणाले, 'माझी सर्वात मोठी प्रेरणा, निःसंशयपणे मी ज्या कुटुंबासोबत वाढलो आहोत ते कुटुंब आहे. आम्ही सर्व जण ३२ वर्षांपासून एकाच छताखाली राहतो. माझ्या आईवडिलांकडून नेहमी प्रेरणा मिळालेली आहे.'

आकाश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या विलक्षण कार्यशैलीवर प्रकाश टाकला. मुकेश अंबानी इंडस्ट्रीत चार दशकांनंतरही रात्री २ वाजेपर्यं...