भारत, जानेवारी 30 -- भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणना होणारे रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच गुजरातच्या गांधीनगर शहरामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. येथील पंडित दिनदयाल एनर्जी युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अंबानी बोलत होते. मुकेश अंबानी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यात पालन केलेली मार्गदर्शक तत्वे विद्यार्थ्यांपुढं विषद केली. अंबानी म्हणाले, 'जीवन जगताना ज्या तत्वांचे पालन मी केलेत ते मी तुम्हाला सांगतोय. ही गोष्ट तुम्हाला लगेच पटणार नाही. परंतु जीवनात काही काळानंतर याचं महत्व लक्षात येईल. आयुष्यात जसे सुखाचे क्षण येतात तसेच दुःखाचेही क्षण येत असतात. आयुष्यात एकीकडे जसा आनंद...