Mumbai, मार्च 20 -- टीम इंडियाचा माजी कर्णाधार एम एस धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. पण तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५ वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी आता ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळतो.

विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी आयपीएलचा मोसम सुरू झाल्यानंतर धोनी आता निवृत्त होणार, अशा चर्चा सुरू होते आणि मोसम संपल्यानंतर या सर्व चर्चा थांबतात. धोनीचा फिटनेस अजूनही चांगला आहे. पण त्याला गुडघेदुखीची समस्या आहे, ज्यासाठी त्याला २०२३ मध्ये ऑपरेशन करावे लागले होते.

दरम्यान, त्याच्यासोबत खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा याने मोठा दावा केला असून तो पुढील ४ वर्षे आयपीएल खेळला तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले आहे.

एमएस धोनीला गुडघ्याची समस्या आहे आणि आयपीएल २०२३ नंतर त्याच्या गुडघ्य...