Mumbai, मार्च 17 -- MS Dhoni on toughest bowler : महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कारकिर्दीत मोठ-मोठ्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्समध्ये माहीची गणना केली जाते, परंतु कोणत्या गोलंदाजाने माजी भारतीय कर्णधाराला सर्वात जास्त त्रास दिला? माही कोणत्या गोलंदाजाला सर्वात धोकादायक मानतो? हे तुम्हाला माहीत आहे का?

वास्तविक, माही मास्टरकार्ड इंडियाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होती. यावेळी त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी धोनीला विचारण्यात आले, की कोणत्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे त्याला सर्वात कठीण गेले? या प्रश्नाला उत्तर देताना माहीने दोन गोलंदाजांची नावे घेतली.

माहीने वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांचे सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून वर्णन केले. माहीच्या मते, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्याव...