Mumbai, फेब्रुवारी 13 -- Worlds Most Expensive Movie : चित्रपटसृष्टीत नेहमीच मोठ्या बजेटचे चित्रपट बनवले गेले आहेत, परंतु काळाबरोबर त्यात आणखी वाढ झाली आहे. आता केवळ हॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतही महागडे चित्रपट बनत आहेत, जे जगभरातील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत. हे चित्रपट त्यांच्या धमाकेदार व्हीएफएक्स आणि अ‍ॅक्शन सीक्वेन्स तसेच दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. ज्यामुळे त्यांचे बजेट आणि कमाई दोन्ही वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बजेट वसूल करून छप्परफाड कमाई केली होती.

आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई देखील केली होती. या चित्रपटाने जगभरात इतकी क...