USA, फेब्रुवारी 14 -- Modi Trump Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान भारताने मोठा निर्णय घेत अमेरिकन दारूवरील शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. भारताने बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. अमेरिकेसोबत व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याच्या योजनेच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरबॉन व्हिस्कीवरील सीमा शुल्कात कपात करण्याची अधिसूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या १३ फेब्रुवारीच्या चर्चेपूर्वी जारी करण्यात आली होती.

बोरबॉन व्हिस्कीच्या आयातीवर आता १५० टक्क्यांऐवजी ५० टक्क्यांपर्यंत सीमा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. या निर्णयानुसार इतर मद्याच्या आयातीवरील सीमा शुल्कात ...