Thane, फेब्रुवारी 5 -- Mhadahousing Scheme : प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे,असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी,दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असूनपुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून ८ लाख घरे उभारली जाणार असल्याची घोषणाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २हजार१४७सदनिका आणि११७भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले की,मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली.घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या...