भारत, जानेवारी 29 -- पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे,पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधवारी (२९ जानेवारी) सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.

दुपारी १ वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच लॉटरीचा निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारेही मिळणार आहे.

पुणे विभागीय लॉटरीसाठी १० ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली होती.यायोजनेच्याअंतर्गत ९३ घरे, २...