Mumbai, जानेवारी 28 -- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे २,१४७सदनिका आणि ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजतालॉटरी काढण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातहीलॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्जअनामत रक्कमेसह आले आहेत.

लॉटरी सोडतीसाठी अनिवार्य परताव्या योग्य अर्नेस्ट मनी डिपॉझिटसह म्हाडाला २४ हजार ९११ अर्ज प्राप्त झाले आहेत. पाच फेब्रुवारी रोजजी दुपारी एक वाजता सोडतीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे कोकण मंडळाने विकसित केलेल्या विविध गृहनिर्माण य...