Mumbai, जानेवारी 29 -- MHADA Housing Scheme २०२५:सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहे.या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फेपुणे,पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी शिंदे बोलत होते.

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर SMS द्वारे दिसणार...