Delhi, फेब्रुवारी 13 -- Meta Layoffs news : जगातील आघाडीची टेक कंपनी मेटा कामगार कपात करणार आहे. तब्बल ५ टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनी युरोप, आशिया व अमेरिकेतील ३,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी योग्य नाही व त्यांनी कंपनीच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही अशा कामगारांना काढून टाकले जाणार असल्याचं मेटाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बाबतचे वृत्त हे बिझनेस इनसायडरने दिले आहे.

मेटाच्या या निर्णयाचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आव्हान दिले आहे. कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कधीच नकारात्मक कामगिरी केलेली नाही. यात मेटावर्क्समधील माजी उत्पादन सल्लागार एलाना रेमन सॅफनर आहेत, ज्यांना कंपनीत तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर या आठवड्याच्या सुर...