Mumbai, मे 8 -- आज ८ मे बुधवारचा दिवस राशीचक्रातील राशींसाठी कमी अधिक प्रमाणात फायद्याचा आणि नुकसानीचा असणार आहे. आज चंद्रापासून दुसऱ्या घरात गुरु तसेच बाराव्या घरात मंगळ आणि बुध असल्याने काही खास शुभ योग जुळून येत आहे. याचा परिणाम मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर कसा होणार हे जाणून घेऊया.

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.शास्त्रानुसार आज जुळून येत असलेल्या त्रियोगाचा बराचसा फायदा या राशीला प्राप्त होणार आहे. व्यवसायात उत्तम जम बसेल. दिवसभर मन उत्साही राहील. मात्र शत्रूंपासून सावधानता बाळगावी लागेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक-सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी एकदा विचार करणे फलदायी ठ...