Mumbai, एप्रिल 25 -- Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आज राशीस्वामी मंगळ आणि चंद्राचा योग पाहता उद्योग व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्...