Mumbai, एप्रिल 29 -- Mesh Vrishabh Mithun Kark horoscope : आज चंद्र धनु राशीत भ्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आज शुक्राशी होणारा शुभ योग पाहता आर्थिक बाबतीत आकस्मिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहिल. भाग्यकारक घटना घडतील. शत्रूला पूर्णपणे कोंडीत प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा ...