Mumbai, एप्रिल 23 -- Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चैत्र शुक्ल पौर्णिमेचा चंद्र कन्या राशीनंतर सिंह राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आज मंगळाचं राशीपरिवर्तन पाहता अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्य...