Mumbai, जानेवारी 29 -- Mauni Amavasya Auspicious Yoga 2025 : महाकुंभातील सर्वात महत्वाचा सण मौनी अमावास्येचे अमृतस्नान बुधवार, २९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. ज्योतिषांच्या कालगणनेनुसार यंदा मौनी अमावस्येच्या तिथीला तब्बल १४४ वर्षांनंतर एक अद्भुत त्रिवेणी योग तयार होत आहे. हा योग समुद्र मंथनाच्या योगासारखाच आहे, या योगात पवित्र त्रिवेणीत स्नान केल्याने सहस्त्र वज्पाय यज्ञ आणि शंभर अश्वमेध यज्ञ असे पुण्य प्राप्त होते, असे ज्योतिषी सांगतात.

हा समुद्र मंथन तुल्य योग मंगळवार, २८ जानेवारी रोजी दुपारी २.३५ ते ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ वाजेपर्यंत चालणार आहे. या योगात स्नान केल्याने तुम्हाला अमृतस्नानाचे फळ मिळेल. महाकुंभातील मौनी अमावस्या तिथीला पवित्र संगमात स्नान करणे मोक्षदायी मानले जाते, असे शास्त्र आणि पुराणांमध्ये वर्णन आहे. ज्योतिषां...