Mumbai, जानेवारी 29 -- Mauni Amavasya: हिंदू धर्मात मौनी अमावस्येचा सण पवित्रता, तपस्या आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानला जातो. यावर्षी मौनी अमावस्या आज बुधवार, दिनांक २९ जानेवारी २०२५, बुधवार रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी भक्त मौन पाळतात आणि गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. मौनी अमावस्येला तयार होणारा दुर्मिळ त्रिवेणी योग या दिवशी स्नान आणि दानाचे महत्त्व वाढवत आहे. मौनी अमावस्या आणि शुभ मुहूर्तावर मौन व्रत धारण करून स्नान केले जाते. मौन व्रत धारण करून स्नान करण्याचे फळ ज्योतिषाकडून जाणून घ्या-

मौनी अमावस्या म्हणजे मौन राहणारी अमावस्या. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी मौन धारण करून पवित्र नदीत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते. माणसाची पापे नष्ट होतात आणि आत्मा शुद्ध होतो. असे मानले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने...