भारत, जानेवारी 29 -- सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे कायम अतिशय चवदार आणि अनोखे पदार्थ बनवताना दिसतात. या शोच्या माध्यमातून अनेक सेलेब्स तुम्हाला एकत्र स्वयंपाक करताना दिसणार आहेत. यावेळी शोमध्ये दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, अनुपमा शोमधील गौरव खन्ना, मिस्टर फैजू, निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी आणि इतर काही प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या सेलिब्रिटींशी शोसाठी तगडे मानधन देखील घेतले आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचा पहिलाच भाग विशेष चर्चेत आला. त्यानंतर आता स्पर्धकांच्या फीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तेजस्वी प्रकाश या शोमध्ये सर्वाधिक पैसे घेत असल्याचे बोलले जात आहे. टेलिकोटियाने दिलेल्या वृत्तानुसार, तेजस्वी दर आठवड्यासाठी ३-४ लाख रुपये घेते.

सेलि...