Mumbai, जानेवारी 25 -- सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि २०१२ ची ऑलिंपिक पदक विजेती मांगते चुंगनेइजंग मेरी कोमने बुधवारी बॉक्सिंगमधून निवृत्ती जाहीर केली.आयबीएच्या नियमांनुसार पुरुष आणि महिला बॉक्सर्सना वयाच्या ४० व्या वर्षापर्यंतच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची मुभा असल्याने मेरी कोमने निवृत्ती जाहीर केली. एका कार्यक्रमादरम्यान ४१ वर्षीय मेरीने सांगितले की, तिला अजूनही देशासाठी खेळायची इच्छा आहे. परंतु, वयोमर्यादेमुळे तिला तिच्या कारकिर्दीवर पडदा टाकावा लागत आहे.

"मला अजूनही खेळायचे आहे. पण दुर्दैवाने वयोमर्यादा संपल्यामुळे मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. मला वयोमर्यादेमुळे राजीनामा द्यावा लागत आहे. मी आता निवृत्त होत आहे.. मी माझ्या आयुष्यात सर्व काही मिळवले आहे,' असे मेरीने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

बॉक्सिंगच्या इतिहासात सह...