Mumbai, जानेवारी 27 -- महान बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम हिने रविवारी (२६ जानेवारी) कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले. प्रयागराजमध्ये डुबकी मारल्यानंतर मेरी कोमने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. यावेळी मेरी कोम खूप आनंदी दिसत होती.

मेरी कोमचा महाकुंभ मेळ्यात स्नान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मेरी कोम पाण्यात बॉक्सिंग पंच मारतानाही दिसत आहे. प्रयागराज येथील संगमात स्नान करताना मेरी कोम म्हणाली, की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांमुळे महाकुंभ संस्मरणीय झाला आहे.

प्रयागराजमध्ये डुबकी घेतल्यानंतर मेरी कोम म्हणाली, की तिला हिंदू धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. तिने कुंभमेळ्यातील तिच्या सहभागाचे वर्णन "सर्...