Mumbai, जानेवारी 29 -- Marathi Serial Bhavya Mangalkarya : मराठी टेलिव्हिजनचा हा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजनची खास मेजवानी घेऊन येणार आहे. 'लक्ष्मी निवास' आणि 'पारू' या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. या भव्य मंगलकार्यासाठी दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब एकत्र येत आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी दळवी कुटुंब सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चार चांद लावायला तयार झाले आहेत. भव्य मंगलकार्य म्हटलं म्हणजे हे कार्य पार पडण्यासाठी स्थळही तितकच भव्य हवं. तेव्हा पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर हे भव्य मंगलकार्य खऱ्या अर्थाने आलिशान महालात पार पडणार आहे.

पण, त्याआधी अहिल्यादेवी आणि जयंतमध्ये या स्थळासाठीची रस्सीखेच सुरू आहे. त्याच दरम्यान हे उलगडणार आहे की अहिल्या आणि लक्ष्मी जिवलग मैत्रिणी आहेत. हे...