Mumbai, एप्रिल 30 -- Marathi Rajbhasha Din 2024 Messages: १ मे ही तारीख फार महत्त्वाची आहे. याच तारखेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन असतो. एवढंच नाही तर मराठी भाषा दिनही १ मे लाच साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं १० एप्रिल १९९७ रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर १ मेला हे ठरलं होतं पण परंतु, कालांतरानं हे परिपत्रक विस्मृतीत गेला. त्यामुळं १९९७ ला शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून १ मे दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. या खास दिनी शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मर...