Mumbai, फेब्रुवारी 8 -- Nikhil Chavan Marathi Natak : सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर, प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरू असून, तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे. आणि हा मालिका विश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच 'लागिरं झालं जी'मधून 'विक्या' म्हणून घराघरांत पोहचलेला निखिल चव्हाण आहे. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

आता रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' या नाटकातून तो रंगमंच गाजवणार आहे. या नाटकाच्या मूळसंचात अभिनेता अंकुश चौध...