भारत, फेब्रुवारी 28 -- थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ असलेला 'अ परफेक्ट मर्डर' या मराठी नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या मराठी रुपांतराने रंगभूमीवर एक वेगळी छाप पाडली आहे.

सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मास्टरपीसच्या मराठी रुपांतराचा पहिला प्रयोग २१ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे हाऊसफुल्ल गर्दीत सादर झाला होता. गूढता आणि रहस्य उलगडत ठेवणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत गेला. अल्पावधीतच या नाटकाने रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री याने पतीची भूमिका, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिने पत्नीची भूमिका आणि सतीश राजवाडे यांनी इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका ताकदीने साकारली होत...