Mumbai, जानेवारी 30 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

रेल्वेच्या नोकरीसाठी एक तरुण मुलाखत द्यायला गेला.

बॉस - जर दोन ट्रेन एकाच रुळावर समोरासमोर येताना दिसल्या तर काय करशील?

मुलगा - लाल झेंडा दाखवेन.

बॉस - लाल झेंडा नसेल तर

मुलगा - मग टॉर्च दाखवून गाड्या थांबवायचा प्रयत्न करेन.

बॉस - टॉर्चही मिळाला नाही तर.

मुलगा - माझा लाल शर्ट काढून दाखवेन

बॉस - तुझ्याकडं लाल रंगाचा शर्ट नसेल तर.

मुलगा - तसं झालं तर आत्याच्या मुलाला फोन...