Sambhajinagar, फेब्रुवारी 2 -- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे.मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव दिला आहे. शेततळ्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली. समाधान रायभान काळ (वय ३८ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ...