Mumbai, फेब्रुवारी 24 -- Manoj Jarange Patil: मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मंजूर केले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणाची मागणी केली होती. पण, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तसेच सगे सोयरेची मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आजपासून दररोज दोन तास रास्ता रोको करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास आजपासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले आहे. मराठा समाजाच्यावतीने त्यां...