Mumbai, जानेवारी 30 -- Manoj Jarange News: मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, असाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांचे वर्षभरातील हे सातवे आंदोलन आहे.

मनोज जरांगे यांच्याव्यतिरिक्त, महिलांसह १०४ कार्यकर्त्यांनी २५ जानेवारीपासून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले. उपोषणदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारच्यावतीने अंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्यात आली. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी...