Mumbai, नोव्हेंबर 30 -- Gujarat Man Kills Daughter: गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली. स्वयंपाक आणि घरातील अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे एका व्यक्तीने पोटच्या मुलीवर प्रेशर कुकरने हल्ला करून तिची हत्या केली. घरात कोणी नसताना ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश परमार (वय, ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सुरत येथील रहिवासी आहे. तर, हेताली परमार (वय, १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. घरातील अपूर्ण कामावरून मुकेश आणि हेताली यांच्यात वाद झाला. या वादातून मुकेशने हेतालीची हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, प्रियकराच्या व्हॉट्सअ‍ॅ...