Mumbai, जानेवारी 31 -- प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. डोके न मुंडवल्याने कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अजय दास यांनी स्वत:ला किन्नर आखाड्याचे संस्थापक असल्याचे सांगितले. त्यांनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचीही हकालपट्टी केली.

देशद्रोहाच्या आरोपी ममता कुलकर्णी यांना आखाड्यात सामावून घेऊन त्यांच्या नकळत महामंडलेश्वर बनवल्याबद्दल त्यांनी महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे लक्ष्मी स्वत:ला संस्थापक म्हणवून घेत आहे. लक्ष्मी म्हणाली की, अजयला २०१७ मध्ये आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ब...