Mumbai, फेब्रुवारी 10 -- Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र मकर राशीतून भ्रमण करीत आहे. शनि-चंद्र विषयोग निर्माण होत असुन वरियान आणि परिघ योगात मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धी मत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासा...