Mumbai, फेब्रुवारी 10 -- Mahesh Babu Marriage Anniversary :अभिनेता महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची पहिली भेट 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी लग्न गाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये लग्न केले होते. दोन मुलं आणि दोन दशकांच्या संसारानंतर महेशने नम्रतासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट बघून त्यांचं लग्न हल्लीच झाल्यासारखं वाटत आहे. दोघांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडत आहे.

लग्नाच्या २०व्या वाढदिवसानिमित्ताने आपला आणि नम्रताचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की, "तू, मी आणि २० सुंदर वर्षे... एनएसजी (हार्ट इमोजी) क...