Mumbai, फेब्रुवारी 14 -- Mahashivratri 2025: हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला अधिक महत्त्व आहे. महाशिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. या महिन्यातील महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी या दिवशी साजरी केली जात आहे. यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. हिंदू धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास इच्छित फळ मिळते. इतकेच नाही तर या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या, महाशिवरात्रीला शिवलिंगावर काय अर्पण करावे.

ज्योतिषशास्त्रानुसार शिव...