Mumbai, जानेवारी 26 -- Mahashivratri 2024 Date Puja Vidhi : महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केला जातो. महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. म्हणूनच या दिवशी देवी पार्वत आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते, यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.

पण यावर्षी महाशिवरात्री कधी आहे, तिची तिथी आणि महत्त्व हे जाणून घेऊया.

पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ८ मार्च रोजी रात्री ९.५७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ मार्चला संध्याकाळी ६.१७ वाजता समाप्त होईल. तथापि, प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व ...