Mumbai, फेब्रुवारी 3 -- Mahashivratri 2025 In Marathi : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला आध्यात्मिक महत्व आहे.

हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत पाळले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबतच सुख आणि सौभाग्यही वाढते. पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाहही याच दिवशी झाला होता. जाणून घेऊया महाशिवरात्री ...