Mumbai, फेब्रुवारी 12 -- Mahashivratri 2025 In Marathi : हिंदू धर्मात महाशिवरात्री व्रताला फार महत्व आहे. महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित आहे. दरवर्षी मार्च महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता असे सांगितले जाते. यंदा महाशिवरात्रीला ग्रह आणि नक्षत्रांची शुभ स्थिती तयार होणार असून, काही राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे.

यावेळी महाशिवरात्रीला अनेक महत्वाचे आणि खास दुर्मिळ योग-संयोग तयार होत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि शनि यांचा विशेष त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीच्या द...