Pune, जानेवारी 27 -- Maharashtra IMD Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल झाले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसांत तपमनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सकाळी आणि रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब या भागात दोन दिवस कडाक्याच्या थंडीसह प्रचंड गारठा पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिणेत तमिळनाडू, केरळ भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील दिसून येणार आहे. त्यामुळे राज्यातील थंडीसाठी तयार झालेल्या वातावरणात बदल होऊन येत्या ४८ तासांत किमान तापमानात काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता व...