Pune, फेब्रुवारी 2 -- Maharashtra IMD Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठा बदल झाला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सकाळी व रात्री गारवा जाणवत असला तरी त्यात घट झाली आहे. १० नंतर ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ होत आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात हवामानात मोठे बदल होणार आहे. तापमानात मोठ वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा राज्या...