Pune, जानेवारी 29 -- Maharashtra IMD Weather Update: राज्यात तापमानात अनेक चढ उतार पहायाल मिळत आहे. राज्यातून थंडी ओसरली आहे. जानेवारी महिना संपत आला असून अनेक जिल्ह्यात थंडी कमी झालेली आहे. असे असले तरी सकाळ-संध्याकाळ वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दोन नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले असून ते धडकणार आहेत. त्यामुळे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात याच परिमाण होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम दिसणार तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आ...