भारत, मे 14 -- Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे,सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मुंबईत धुळीच्या वादळासोबत, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे ८ जणांचा बळी गेला. मुंबई, ठाणे पालघरला आज दुहेरी इशारा आहे. मुंबई, पालघर येथे आज दुपारी उष्ण व दमट हवामान राहणार असून संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्याच्या सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामानाचा अंदाज वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्...