Pune, फेब्रुवारी 12 -- Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत राज्यातील तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात सध्या हवामान कोरडे असून पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. दारम्य, पुण्यासह मराठवाड्यात उष्णतेच्या झळा कायम आहेत. तर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. तापमानात घट होऊन थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मंगळवारी ३४ डिग्री सेल्सिअस कमाल तर १४ डिग्री सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते ती...