Pune, फेब्रुवारी 6 -- Maharashtra Weather Update : नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात किमान तापमानात आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या चारही उपविभागात तापमान हे ३५ शी च्या पुढे गेले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नोंदवण्यात आलं आहे. येथे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी तापमान नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले आहे. येथे पारा १९ डिग्री अंश सेल्सिअस होता. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागांमध्ये पुढील चार-पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमा...