Pune, फेब्रुवारी 3 -- Maharashtra Weather Update : राज्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. कधी थंडी पडत आहे तर कधी उष्णता. सध्या राज्यात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. तर दिवसा प्रचंड उकाडा जानवत आहे. फेब्रुवारी हा थंडीचा महिना असला तरी पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात उन्हाची तीव्रता ही वाढू लागली आहे. राज्यात पुढील २ ते ४ दिवसांत किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. राज्यात फेब्रुवारीपासून तापमान वाढीला सुरुवात होणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात असून ये...