Pune, फेब्रुवारी 5 -- Maharashtra Weather Update: राज्यात संध्या तापमानात मोठा बदल पाहायला मिळत आहे थंडीचा महिना असतांना देखील फेब्रुवारीत उन्हाच्या झळा नागरिक अनुभवत आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तापमान हे ३५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहेत. सध्या राज्यात कोरडे वारे वाहत असून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळी आणि रात्रीच्या थंडीचे प्रमाण देखील कमी झाले असून नागरिक उकड्याने हैराण झाले आहेत.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कमाल तापमानाचा आकडा वाढत आहे. तर किमान तापमानातही वाढ होत आहे. विदर्भात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत पारा पोहोचला आहे. कोकणातील रत्नागिरी इथं पारा ३५ च्या पुढे होता. त...