Pune, फेब्रुवारी 10 -- Maharashtra Weather Update : राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. तसेच कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात बदल होणार नाही. रविवारी सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथील तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. तर सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नोंदवले गेले. येथे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उन्हाचा चटका वाढला असून थंडी जळवपास पूर्ण गायब झाली आहे. आधी सकाळी व संध्याकाळी गारठा जाणवत होता. मात्र, आता तो देखील जाणवत नसल्याने जिवाची लाही लाही होत आहे. रविवार...