Pune, जानेवारी 30 -- Maharashtra IMD weather forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबतचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी वगळता दिवसभर उष्ण हवामान असतं. पुण्यात देखील हीच परिस्थिती आहे. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहाटेच्या वेळी विरळ धुके पडत असून दिवसभर कडक ऊन पडत आहे. दरम्यान, शनिवारनंतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तरेत पश्चिम चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर मराठवाड्यात २ व ...