Pune, फेब्रुवारी 13 -- Maharashtra Weather Update: राज्याच्या तापमानात मोठे बदल झाले आहे. हवामानात चढ उतार होत आहे. राज्यातून थंडी पूर्णपणे गायब झाली होती. ही थंडी आता पुन्हा परतू लागली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे. तर दुपारी मात्र, उष्णतेमुळे नागरिक बेजार होत आहे. पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात १ ते २ अंशाची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात १ ते २ अंश डिग्री सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसली वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिव...