Pune, जानेवारी 28 -- Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठे बदल झाले आहे. पुढील २४ तासांत यात आणखी बदल होणार आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात तब्बल २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. काही भागांमध्ये तापमान वाढले आहे. तर काही ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी थंडी वाढली आहे. राज्यात थंडी आणि उष्णता या दोन्हीमुळे आजाराचे देखील प्रमाण वाढले आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी हलका गारठा व धुके पडत आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन भागात दोन वेगवेगळ्या प्रकारचे पश्चिमी चक्रावात तयार झाले आहे. याचा गंभीर परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर दक्षिणेत देखील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर देखील होणार आहे. राज्याच्या हवामान...